पुणे जिल्ह्यात खळबळ, बहिणीशी बोलला म्हणून कोयत्याने वार करत तरुणाला संपवलं,

बारामतीत पुन्हा एकदा कोयत्याने वार करून एका २३ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. तुळजाराम चतुचंद महाविद्यालय रस्त्यावर ही घटना घडली. मावस बहिणीशी बोलण्यावरून झालेल्या वादातून तिघांनी युवकावर हल्ला केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. गेल्या सहा महिन्यांत बारामतीत घडलेला हा तिसरा खून असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. बारामतीत सहा महिन्यापूर्वीच तुळजाराम चतुचंद कॉलेजच्या आवारातच एका विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्त्यावर 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने निर्घृण वार करत खून करण्यात आला. गेल्या सहा महिन्यातील हा तिसरा खुनाचा प्रकार असून या घटनेने बारामती हादरली. बारामतीत गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत अनिकेत सदाशिव गजाकस या युवकावर कोयत्याने वार करण्यात आले. हातावर नाकावर, डोळ्यावर आणि मानेवर कोयत्याने जोरदार वार केल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत हा मावस बहिणीशी बोलतो याचा राग येऊन तिघा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अनिकेतचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेत अनिकेचा भाऊ अभिषेक सदाशिव गजाकस यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदकिशोर पंजाबराव अंभोरे, (रा प्रगतीनगर ता बारामती जि पुणे) 2) महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड जिजामातानगर बारामती जि पुणे) 3) संग्राम खंडाळे (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन चेके करत आहेत. राज्यामध्ये कायदा सुरक्षेचे तीनतेरा वाजलेले दिसून येत आहेत. कल्याणमध्ये मराठी माणसांना गुंडांकडून मारहाण करण्यात आली आहे. मराठी माणसे घाण आहात तुम्ही मासे खाता, तुमचा वास येतो म्हणत अखिलेश शुक्ला याने मराठी भाषिकांन सराईत गुंडांना सांगून माराहण केल्याचा आरोप पीडित रहिवाशांनी केला आहे. तर नागपूरमध्ये पेट्रोल चालक महिलेचा जाहिररित्या अपमान करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर त्या महिलेला माफी मागायला लावली. १८ डिसेंबरला हा प्रकार झाला. या घटनांमुळे राज्यात कायदा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

  • Related Posts

    जळगावमधील पत्रकारांसाठी ‘नवी गृहनिर्माण सोसायटी’ काढण्यासाठी मदत करणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील.

    जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) पत्रकार संघाकडून पत्रकारांना हेल्मेट देणे ही अत्यंत स्तुत्य गोष्ट असल्याचे सांगून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणातून आम्हालाही योग्य तो बोध मिळतो…

    भर चौकात घेत होता गर्लफ्रेंडचा प्राण, रस्त्यावर लोळवून तोडत होता मान, पण तेवढ्यात…धक्कादायक व्हिडीओ व्हायरल.

    एक बॉयफ्रेंड भर रस्त्यात सगळ्यांसमोर आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं या मुलीला रस्त्यावर लोळवलं आणि तिची मान तोडत होता. पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही देखील शॉक्ड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमधील पत्रकारांसाठी ‘नवी गृहनिर्माण सोसायटी’ काढण्यासाठी मदत करणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील.

    जळगावमधील पत्रकारांसाठी ‘नवी  गृहनिर्माण सोसायटी’ काढण्यासाठी मदत करणार   – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील.

    भर चौकात घेत होता गर्लफ्रेंडचा प्राण, रस्त्यावर लोळवून तोडत होता मान, पण तेवढ्यात…धक्कादायक व्हिडीओ व्हायरल.

    भर चौकात घेत होता गर्लफ्रेंडचा प्राण, रस्त्यावर लोळवून तोडत होता मान, पण तेवढ्यात…धक्कादायक व्हिडीओ व्हायरल.

    चीनमधील HMPV विषाणूची भारतात पहिली केस, 8 महिन्यांच्या मुलीला झाला संसर्ग जाणून घ्याल .

    चीनमधील HMPV विषाणूची भारतात पहिली केस, 8 महिन्यांच्या मुलीला झाला संसर्ग जाणून घ्याल .

    खंडणी प्रकरणाचा गेम फिरला? पुण्यातील कुख्यात गुंड घायवळसोबत धसांचे संबंध, बिक्कडने फोडला मोठा बॉम्ब.

    खंडणी प्रकरणाचा गेम फिरला? पुण्यातील कुख्यात गुंड घायवळसोबत धसांचे संबंध, बिक्कडने फोडला मोठा बॉम्ब.