रा.काँ.प.श.प.च्या वतीने जोडे मारो आंदोलन.

रा.काँ.प.श.प.च्या वतीने जोडे मारो आंदोलन.

धरणगाव तालुका प्रतिनिधी — राजु बाविस्कर, धरणगाव — येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पवार साहेबांच्या बाबतीत उपमर्दकारक वक्तव्य करणाऱ्या आमदार पडळकर व खोत यांचे फोटो असलेल्या बॅनरला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या देशात मनुस्मृती समर्थकांची संस्कृती सर्वदूर फोफावली आहे. ज्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता प्रस्थापित करण्यासाठी संविधान दिले त्यांचा जयघोष झाल्याने अनेकांना पोटशूळ उठतंय म्हणून आजचे जोडे मारो आंदोलन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून करण्यात आले. तद्नंतर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला माल्यार्पण करून धरणगाव पोलीस स्टेशन येथे स.पो.नि. निलेश वाघ यांना देण्यात आले. या निवेदनात अर्जदार लक्ष्मण पाटील यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदा खोत यांनी जाहीर सभेद्वारे दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने शरदचंद्रजी पवार साहेब यांचा अपमान केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील शांतता भंग होऊन जातीय व सामाजिक तणाव निर्माण होण्याचा धोका आहे. त्यांनी जाणीवपूर्वक शरदचंद्रजी पवार यांचेविरुध्द अपमानास्पद व अर्वाच्च्य भाषेचा वापर केला असून समाजामध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.

ही कृती महाराष्ट्राच्या शांतताप्रिय व प्रगतशील संस्कृतीस विरोध करणारी असून समाजामध्ये असंतोष निर्माण करण्याचे कट कारस्थान आहे. गेल्या काही वर्षांपासून हेतुपुरस्सर पवार साहेबांबद्दल अर्वाच्च्य भाषा वापरली जाते व चारित्र्यहनन केले जाते, तरी याचा कायदेशिर बंदोबस्त झाला पाहिजे. त्यामुळे त्यांचेविरुध्द खालील भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. यात कलम – (१९२) समाजामध्ये तेढ निर्माण करणे, कलम (३५२) जाणून-बुजून शांतताभंग होईल असे कृत्य करणे, कलम (५९ व ६१- अ) गुन्हेगारी स्वरुपाचे षडयंत्र रचणे; अशा स्वरूपाचा गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार धरणगाव तालुका व शहर यांनी केली आहे. या निषेध आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, माजी नगरसेवक हाजी इब्राहीम, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, सोनवदचे बाळासाहेब पाटील, उज्वल पाटील, रविंद्र पाटील, उत्तम भदाणे, बापू मोरे, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, रा.काँ.अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष नईम काझी, अमित शिंदे, प्रा.आर.एन.भदाणे, अनिल पाटील, अमोल हरपे, हितेंद्र पाटील, तसेच शहरातील खलील खान, रमेश महाजन, रविंद्र महाजन, राजेंद्र गायकवाड सर, राजेंद्र सोनवणे, महेंद्र पाटील, सागर महाले, सागर महाजन, गोपाल महाजन, विक्रम पाटील, अजयसिंग टाक, विजयसिंग टाक, लालसिंग टाक, जुनेद बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Related Posts

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    एका डॉक्टरनेच ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कार घुसवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरने केलेल्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तालेब याने भर…

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    एका डिलिव्हरी बॉयने पार्सल देताच स्फोट झाला. या स्फोटात डिलिव्हरी बॉय आणि पार्सल घेणारी व्यक्ती जखमी झाली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले असून, जुन्या वैमनस्यातून हा स्फोट घडवल्याचा संशय आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न