इंग्रज कालीन पाईपलाईन चोरी प्रकरण, जाणून घ्या. जळगावमध्ये मोठा राजकीय पुढारी अडकण्याची शक्यता?

निवडणुकीच्या निकालानंतर जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाची घटना घडली. गिरणा पंपींग प्लांटवरील जुनी पाईपलाईन जीसीबी द्वारे खोदून चोरली जात होती. मनपा अभियंत्याच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात राजकीय नेताचाही हात असण्याची शक्यता आहे. पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. निवडणुकीची धामधूम संपतास निकालानंतर अवघ्या दहा दिवसांनी जळगाव जिल्ह्यात एक मोठी घटना घडली या घटनेमध्ये एक जिल्ह्यातील तथा जळगाव शहरातील राजकीय व्यक्तीचा हात असल्याची चर्चा देखील सुरू आहे ती चर्चा म्हणजे एक इंग्रज काळातील टाकलेली पाईपलाईन चोरी प्रकरणातील आहे.


जळगाव शहराला कधी काळी पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा पंपींग प्लांटवरून येणारी जुनी पाईपलाइन जेसीबीद्वारे चारी खोदून चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनपा अभियंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून काही मोठे चेहरे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जळगाव शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.२ रोजी ते उमाळे येथील फिल्टर प्लॉन्टचे कामकाज पाहण्यासाठी गेलो असता त्यांना कॉण्ट्रक्टर सुमीत सोनवणे यांनी फोन केला. गिरणा पंपींग जवळ आर्यन पार्कच्या समोर असलेली जुनी पाण्याची लोखंडी पाईप लाईन कोणीतरी जेसीबी वाहनाच्या साह्याय्याने चारी खोदुन काढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बोरोले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. सायंकाळी ६.३० वाजेचे सुमारास योगेश बोरोले हे शामकांत भांडारकर (इंजीनिअर), विशाल सुर्वे, दिपक चौधरी यांच्यासह त्याठिकाणी पोहचले. त्यावेळी एक पिवळ्या रंगाचे जेसीबीवरील दोन इसम हे जेसीबीच्या साह्याय्याने जुन्या पाईप लाईन मधील बीडचे पाईप काढताना मिळुन आले. जेसीबी चालक नरेंद्र निवृत्ती पाणगडे, व रवण चव्हाण अशी त्यांची नावे समोर आली. अधिकाऱ्यांनी दोघांना जेसीबीच्या खाली उतरण्यास सांगितले असता रवण चव्हाण हा लक्ष विचलीत करुन तेथून पळून गेला. नरेंद्र पाणगडे याचेकडे चौकशी करीत असताना अक्षय अग्रवाल हा देखील त्या ठिकाणी उपस्थित झाला. नरेंद्र पाणगडे यास सदरची पाईप लाईन कोणी खोदावयास सांगितली? अशी विचारणा केली असता त्याने अक्षय अग्रवाल, भावेश पाटील व अमिन राठोड यांचे सांगण्यावरुन खोदली असुन सदर जेसीबी आणण्याबाबत अक्षय अग्रवाल याने मला सांगितल्याने मी सदर जेसीबी आणुन त्याव्दारे पाईप लाईन खोदुन त्यातुन जुने पाईप काढत असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी अक्षय अग्रवाल याचेकडे चौकशी केली असता त्यानेच सदर जेसीबी वाहन सदर ठिकाणी पाठविल्याचे सांगितले. यावरून महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता योगेश बोरुडे यांच्या फिर्यादीवरून मेहरून परिसरातील सुनील सुपडू महाजन, अक्षय अग्रवाल, नरेंद्र पानगडे, रवण चव्हाण, भावेश पाटील, अमीन राठोड आणि या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात एका राजकीय नेत्याचा हात असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र तो नेता कोण हे लवकरच समोर येणार आहेयासंदर्भात पालिकेच्या उपभियंतांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. तर एक आरोपी अद्याप फरार असून त्या फरार आरोपीचा तपास पोलीस घेत असून लवकरच त्या आरोपीच्या मुस्क्या आवळल्या जाणार असल्याचं जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी सांगितलं.

  • Related Posts

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे…

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न