अजित पवार महायुतीत नसते तर… गुलाबराव पाटील असं का म्हणाले

अजित पवार महायुतीत नसते तर… गुलाबराव पाटील असं का म्हणाले

जळगाव : अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आमच्या महायुतीत नसता तर आम्ही शिवसेना शिंदे गटाने शंभर जागा जिंकल्या असत्या, असा दावा माजी पाणीपुरवठा मंत्री तथा शिंदे गटाचे नेते आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाटील यांनी अजित पवार गटावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट विधानसभा निवडणुकीत एकूण 85 जागांवर लढला आणि 57 उमेदवार निवडून आले. महायुतीत अजित पवार आमच्यामध्ये नसते तर आमच्या 90 ते 100 जागा निवडून आल्या असत्या. परंतु महायुतीने अजित पवारांना घेतल्यावर आम्ही विरोध केला नाही. एकनाथ शिदे यांनी भाजपला तुम्ही अजित पवारांना का घेतलंत? असा प्रश्न विचारला नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

महायुतीत मिठाचा खडा टाकू नका : मिटकरी

अजित पवार नसते तर शिंदे गटाच्या 90 ते 100 जागा आल्या असत्या हा गुलाबराव पाटील यांचा गोड गैरसमज आहे. त्यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

  • Related Posts

    पोलीसच निघाले भामटे, ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच PSI सह ५ जण जेरबंद

    पोलीसच निघाले भामटे, ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच PSI सह ५ जण जेरबंद जळगाव पोलीस दलाला हादरून सोडणारी एक बातमी समोर आली आहे. पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका…

    चिठ्ठी लिहून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल. पतीला समोर पाहताच हंबरडा फोडला.

    जळगावात एका तरुण शिक्षकाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने चिठ्ठी लिहूजळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात एका खाजगी शिक्षकाने आजाराला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न