गणित संबोध परीक्षेत देवरे विद्यालयाचे विद्यार्थी उत्तीर्ण.
विखरण- श्री. धंगाई विधायक कार्य मंडळाच्या आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयातील इ.५वी व इ.८वीच्या विद्यार्थ्यांनी नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळांतर्गत आयोजित संबोध परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी १००%सुयश प्राप्त केले.इ.५वी वर्गामधून प्रथम मित्तल दिनेश कोळी द्वितीय विनीत प्रशांत पाटील व तृतीय दीक्षा अनिल पाटील तसेच इ.आठवी गणित संबोध परीक्षेतून प्रथम भावेश संतोष पानपाटील हर्षदा प्रकाश शिरसाट द्वितीय भूमिका प्रकाश मराठे तर गुंजन रवींद्र पाटीलने तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यशस्वीतांना गणित शिक्षक एम.डी.नेरकर, एस.एच. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वितांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्गाकडून अभिनंदनासह कौतुक केले जात आहे.