निकाल लागला,पण मंत्री कोण होणार? जळगाव जिल्ह्यातील ‘ही’ सात नाव शर्यतीत

निकाल लागला,पण मंत्री कोण होणार? जळगाव जिल्ह्यातील ‘ही’ सात नाव शर्यतीत

जळगाव : विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभुतपुर्व यश मिळवले आहे. यानंतर राज्यात महायुतीच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशात जळगाव जिल्ह्यात महायुतीने 11 पैकी 11 जागा जिंकत जळगाव जिल्हा हा महायुतीचा असल्याचे सिद्ध केले आहे.त्यामुळे आता राज्यात मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते? आणि जळगाव जिल्ह्यातून कुणाकुणाला मंत्रिपदाची संधी मिळते? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे,. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 आमदार मुंबईला रवाना झाले असून, लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदासह मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे.त्यामुळे नवीन सरकारमध्ये जिल्ह्यातील किती आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे सरकारच्या काळात जळगाव जिल्ह्याला 3 कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली होती. यामध्ये शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील,भाजपचे विद्यमान मंत्री गिरीश महाजन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली होती. आता या नेत्यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे. तर सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण संजय सावकारेंसह एकूण सात जणांची नावे चर्चेंत आहेत.

जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे हेही स्पर्धेत आहेत, ते तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यातच लेवा पाटील समाजाचे असल्याने, भाजपकडून त्यांना संधी दिली जाण्याचीही शक्यता आहे. तसेच पाचोऱ्याचे किशोर पाटील हेही तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर किशोर पाटील हे सर्वात आधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे त्यांचेही नाव मंत्रीपदासाठी चर्चेत आहे.चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे भाजपमधील नवीन नेतृत्व म्हणून पुढे आले आहे. अमित शाह यांच्या चाळीसगावमधील सभेत नव्या मंत्रिमंडळात चव्हाण यांना स्थान असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यातच चव्हाण हे फडणवीस व महाजन यांचेही निकटवर्तीय मानले जातात.

भुसावळचे आमदार संजय सावकारे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जळगावचे पालकमंत्रीपदही भूषविले आहे. त्यामुळे त्यांचे नावही मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहे.

  • Related Posts

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे…

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

    पुण्याचाही झालाय बिहार; मनगट, कोपऱ्यापासून तोडला हात.

    पुण्याचाही झालाय बिहार; मनगट, कोपऱ्यापासून तोडला हात.