कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

खानदेशात रब्बी हंगामात कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी काहीशी वाढणार आहे. पेरणीला गती आली आहे. तापी, अनेर, पांझरा, गिरणा आदी नद्यांच्या क्षेत्रातील पेरणी अधिक आहे. यंदा सुमारे १५ ते १८ हजार हेक्टरवर कोरडवाहू दादर ज्वारी पीक राहील, असे संकेत आहेतपीक निसवण जानेवारीत होते. सध्या पीक वाढत आहे. काही भागात पीक अंकुरत आहे. तर अनेक भागात पेरणी सुरू आहे. कोरडवाहू दादर ज्वारी जोमात येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. अनेकांची पेरणी अपूर्ण असून, ती पूर्ण करून घेण्याच्या लगबगीत शेतकरी आहेत.खानदेशात यंदा सुमारे ३९ हजार हेक्टरवर दादर व अन्य बागायती संकरित ज्वारीची पेरणी होणार आहे. ही पेरणी मका पिकापेक्षा कमी असणार आहे. कारण ज्वारीचे दर मागील वेळेस कमी होते. तसेच पुढे चाऱ्याची समस्या कमी राहील, यासाठी ज्वारीच्या चाऱ्यासही मागणी कमी राहील.

यामुळे अनेकांनी मका व इतर पिकांची लागवड केली आहे. परंतु गिरणा, तापी व पांझरा नदीच्या क्षेत्रात अनेकांनी आपल्या कोरडवाहू क्षेत्रात पारंपरिक व चांगले उत्पादनक्षम पीक म्हणून ज्वारीची पेरणी केली आहे. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी काहीशी वाढणार आहे. कारण पाऊस चांगला झाल्याने जमिनीत ओलावा आहे. पेरणीत मोठी वाढ यंदा होणार नाही.जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा या भागांत ज्वारी पीक अधिक असणार आहे. भडगावातील खेडगाव व लगत ज्वारीचे मोठे क्षेत्र आहे. धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा व धुळे तालुक्यात ज्वारी पीक असून, नंदुरबारमध्ये शहादा, तळोदा, नंदुरबार भागात ज्वारीची पेरणी बऱ्यापैकी होणार असल्याची माहिती मिळाली. अनेक शेतकरी यंदा दादर ज्वारीला एकदा सिंचन करण्याची व्यवस्थाही करीत आहेत. कारण एक पाणी दिल्यास पीक आणखी जोमात येईल, असे शेतकरी मानतात.ज्वारीसाठी क्षेत्र नापेर अनेक मंडलांत ओल्या दुष्काळाची परिस्थिती असल्याने यावर्षी ज्वारीची पेरणी वाढणार आहे. या परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी कोरडवाहू ज्वारीचे पीक पाणी उपलब्ध असतानाही घेण्याचे नियोजन केले आहे. अनेकांनी दादर ज्वारीसाठी क्षेत्र नापेर ठेवले होते. त्यात पेरणी झाली आहे. पीक तरारले आहे. या पिकाची वाढ गतीने होते. उंची १२ ते १३ फूट असते. यामुळे ज्वारीच्या पिकात माचवा करून त्यावर उभारून राखण करण्याचे चित्र पुढे दिसेल, अशी स्थिती आहे.

  • Related Posts

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे…

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!