राज्यस्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेला श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरुवात.
12 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धेचे आयोजन
जळगाव दि.12 ( जिमाका )- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जिल्हा सेपक टकारा असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय सेपक टकरा (17 व 19 वर्षे मुले / मुली ) क्रीडा स्पर्धा 2024- 25 चे आयोजन दि. 12 ते 14 नोव्हेंबर, या कालावधीत . छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेत राज्यातील मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, लातुर, संभाजीनगर, कोल्हापूर व नाशिक असे एकूण आठ विभागातुन 17 व 19 वर्षे गटातील जवळजवळ 200 खेळाडू तसेच खेळाडूंसोबत संघ व्यावस्थापक, मार्गदर्शक, तांत्रिक अधिकारी आणि स्वंयसेवक स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. सदर स्पर्धेतून महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींचा संघ निवडण्यात येणार असून पुढे तो संघ शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
आज 11 वाजता या स्पर्धेचे उदघाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त – प्रदीप तळवेलकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त – श्रीमती अंजली पाटील, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महाराष्ट्र सेपक टाकरा संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंत लुंगे, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव राजेश जाधव, जिल्हा विधीसेवा विभाग व समुपदेशकश्रीमती भारती कुमावत , ऐश्वर्या मंत्री, इकबाल मिर्झा, . आसिफ मिर्झा, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
तसेच सदर कार्यक्रमा प्रसंगी सचिन निकम- क्रीडा अधिकारी, सुरेश थरकुडे – क्रीडा अधिकारी,. मिनल थोरात क्रीडा मार्गदर्शक, श्रीमती चंचल माळी क्रीडा मार्गदर्शक, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक आसिफ मिर्झा यांनी केले तर आभारकिशोर चौधरी, क्रीडा मार्गदर्शक यांनी मानले.