प्रमोद देविदास पाटील लेखापरिक्षक सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न: सहकारातून सहकार्य वृत्ती जोपासणारे व्यक्तीमत्व प्रमाद पाटील: चंद्रकांत चौधरी यांचे मत .
भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे ; थोरगव्हाण येथून जवळच असलेले चुनवाडे ता रावेर योथिल मुळ रहिवासी प्रमोद पाटील ऑडीटर सेवानिवृत्त महाराष्ट् शासनाच्या सहकार खाते लेखापरिक्षण विभागातून लेखापरिक्षक म्हणून प्रमोद देविदास पाटील (मुळगाव चुनवाडे ता . रावेर ह मु भुसावळ )नुकतेच सेवा निवृत्त झाले आहेत . त्यांचे सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला स्व . देविदास ( दादाराव ) त्र्यंबक पाटील यांचे धाकटे चिरंजीव आहे . सहकाराचे उच्च शिक्षण घेवुन प्रमोद पाटील यांनी सहकार खात्यात 25 सप्टेंबर 1991 सहकाराचे आगार अहमदनगर येथून प्रथम सुरवात केली . भुसावळ , रावेर , जामनेर , मुक्ताईनगर , यावल अशा ठिकाणी एकुण 33 वर्षे सेवा केली . 30 ऑक्टोंबर 2024 रोजी प्रमोद पाटील यांचा स्टाफ् तर्फे सेवानिवृत्ती निमित्त सत्कार झाला .
उत्कृष्ठ सेवाकार्यात त्यांनी 3 सहकारी संस्थावर हिशेब अफरा ताफरी बाबत गुन्हे दाखल करण्याचे धारिष्ठ त्यांनी दाखवले होते . सेवपूर्ती सोहळा प्रसंगी मनोगतातून चंद्रकांत चौधरी सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण सहकारातून सहकार्य वृत्ती जोपासणारे व्यक्तिमत्व प्रमोद पाटील साहेब यांनी भुसावळ येथे कार्यरत असतांना त्यांनी केलेल्या प्रशासकीय , सामाजिक कार्याचा गौरव केला , अशोक चौधरी यांनी कर्तुत्व आणि दातृत्व याचे धनी, शिक्षक सुधाकर सपकाळे यांनी मित्र वणव्या मधे गारण्या सारखा असे संबोधन सर्व मित्रांन तर्फे केले, जेष्ठ बंधु अनिल पाटील सेवानिवृत्त कृषी अधिकारी यांनी परिवारा तर्फे मनोगत व्यक्त केले लेखा परिक्षण करणे कार्य हे तारेवरची कसरत असते या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्यकरून स्वच्छ प्रतिमा घेवून माझे बंधू सेवानिवृत्त झाले याचा अभिमान आहे .अशा शब्दात वक्त्यांनी त्यांचे उत्कृष्ठ कार्याचा आढावा घेतला विविध सामाजिक गृप , मित्र , नातेवाईक , सेवा सहकार यावल कार्यालयातील अधिकारी , सहकारी , संघटना यांचे तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या .