देशमुख विद्यालयात स्मार्ट टी व्ही भेट दिला व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न मोतीचूर लाडू वाटप .
भुसावळ प्रतिनीधी युवराज कुरकुरे
थोरगव्हाण येथे सेवा निवृत्त माजी कामगार नेते टी . आर.चौधरी (एस. टी . विभाग जळगांव ) यांचे ।तर्फे डी . एस . देशमुख विद्यालयात 18 ऑक्टेंबर रोजी इयत्ता 5 वी ते 12 वी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न म्हणुन मोतीचूर लाडू वाटप केले .
पोषण आहारा सोबत पुरक मिष्टान्न देण्यासाठीचे दातृत्व संस्थेच्या जनरल मिटिंग वेळी उपस्थित असतांना दाते तुकाराम रावजी चौधरी मुळगाव लहान वाघोदा ह .मु . जळगांव यांनी स्वीकारले होते त्याची पूर्ती मिष्ठान्न मोतीचूर लाडू त्यांचे शुभहस्ते वाटप केले. प्रथमसत्र परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे तोंडगोळ झाल्याचा आनंद चेहऱ्यावर जाणवत होता .
शाळेला मोठा स्क्रीन असलेला 50 इंची स्मार्ट अँड्रॉइड TV संप्रेम भेट दिला . विविध नाविन्यपूर्ण उपक्रम शैक्षणिक video पाहाण्यासाठी TV उपयुक्त ठरेल असे मत दाते टी आर चौधरी यांनी व्यक्त केले .
त्यांचे या कौतुकास्पद कार्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकात चौधरी यांनी टी आर चौधरी यांचा शॉल , बुके देवून सत्कार केला . संस्था पदाधिकारी उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर सचिव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख संचालक रजनी पाटील , चंद्रकांत देशमुख , राजेंद्र देशमुख , कमलाकर चौधरी , मधुकर कोल्हे , प्रकाश बाऊस्कर , नंदकुमार चौधरी , संजय चौधरी , चंद्रकांत पाटील , रविंद्र चौधरी , दिनेश पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला . विभागीय पातळीवर भालाफेक प्रकारात निवड झालेली विद्यार्थीनी दिपाली कोळी हीस विजयी शुभेच्छा दिल्या व टी आर चौधरी यांचे कडून बक्षिस पाचशे रुपये रोख देण्यात आले .
मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव पर्यवेक्षक डी के पाटील सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी दात्यांच्या या स्तुत्य उपकमाचे अभिनंदन कौतुक केले आहे .