जय गुरुदेव माध्यमिक विद्यालयात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी.
धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर, धरणगाव – खर्दे येथील जय गुरुदेव माध्यमिक विद्यालयात आज रोजी भारताचे माजी राष्ट्रपती तसेच भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक विलास चौधरी यांनी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजन केले. या निमित्ताने वाचन प्रेरणा दिवस व जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिवस निमित्ताने शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन केले. व तसेच हात धुवा उपक्रम साजरा करण्यात आला. त्यावेळी श्याम सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती सांगितली. याप्रसंगी राजेश माळी व योगेश पाटील यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले चंद्रकांत भोळे. व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समितीचे प्रमुख विकास शिरसाट यांनी केले. तर आभार नरेंद्र चौधरी यांनी मानले.