देवरे विद्यालयात जागतिक ओझोन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन.
नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे श्री.धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित श्री. आप्पासो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता. जि. नंदुरबार येथे जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. डी. साळुंके तर प्रमुख वक्ते वाय. डी. बागुल यांनी ओझोन थर म्हणजे काय ? ओझोन थर कमी होणे म्हणजे काय? ओझोन थर कमी होण्याची कारणे ? ओझोन थराचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम ? ओझोन थर नियंत्रण न ठेवल्यास 2050 पर्यंत ओझोन थराची मोठी हानी होऊ शकते. या सर्व विषयाची पीपीटद्वारे विस्तृत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. डी. साळुंकेंनी आपल्या भाषणातून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक करणामुळे व इंधन वाहनांच्या धुरामधून मोठ्या प्रमाणात हरित वायू उत्सर्जित करतात.ज्यामुळे ग्लोबल वार्मिंग तसेच ओझोनचा ऱ्हास होतो त्यामुळे वाहनांचा वापर कमीत कमी करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका डॉ. आर. आर. बागुल तर आभार प्रदर्शन विजय अहिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी.व्ही. नांद्रे, डी. बी. भारती, एम.डी. नेरकर एम. एस. मराठी, श्रीम. एस. एच गायकवाड, एस.जी.पाटील, एच. एम. खैरनार आदींनी संयोजन व सहकार्य केले.