“अम्न व इंसाफ ( शांतता व न्याय) कायम करो” मौलाना सज्जाद नोमानी यांचे आवाहन.
देशात नव्हे तर जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स अ )यांच्या चारित्र्य प्रमाणे जर आपण समाजात शांतता आणि न्याय स्थापन करून एकमेकांशी वागलो, कोणा सोबतही अन्याय केला नाही, प्रत्येक गोष्टीत न्याय केला तर मानवाची प्रगती व उन्नती होईल त्यासाठी आमचे कर्तव्य आहे की आम्ही शांतता व न्याय ( अम्न व इंसाफ) ची भूमिका निभवावी असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुस्लिम धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांनी केले.
सिरत कमिटी जळगाव आयोजित ईद ए मीलाद निमित्त दोन दिवसीय जळगाव दौऱ्यावर आलेले मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते तथा आंतरराष्ट्रीय मुस्लिम धर्मगुरू यांनी काल रात्री मुस्लिम ईदगाह मैदानावर जाहीर प्रवचनाद्वारे उपस्थित लाखो लोकांना आव्हान केले. आपण स्वतः शांती व न्यायासाठी प्रयत्नशील राहा ज्याप्रमाणे आपल्याला अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स अ)यांनी आपल्या जीवन चरित्र द्वारे शिकवण दिलेली आहे ती अंगीकारली तर निश्चितच आपण यशस्वी होऊ. सर्वात जास्त जबाबदारी त्यांनी धर्मगुरूं वर लादली.
तीरस्काराचे उत्तर तीरस्काराने नव्हे तर प्रेमाने द्या इस्लाम धर्माचे तत्त्वानुसार जर कोणी आमच्याशी तिरस्काराने वागत असेल, तिरस्काराने बोलत असेल तर आम्ही त्यांचेशी प्रेमाने वागावे असे उदाहरण सह त्यांनी स्पष्ट केले सर्व समाजाच्या धर्मस्थळाचे ईश्वर रक्षण करो – प्रार्थना शेवटी मौलाना सज्जाद नोमानी यांनी (दुवा) प्रार्थना केली त्यात त्यांनी स्पष्टपणे या देशातील नव्हे तर जगातील सर्व मंदिर ,मशीद, चर्च , गुरुद्वारा, बुद्ध विहार, यांची ईश्वर अल्लाह संरक्षण करो, आपसात बंधुभाव निर्माण होऊन कटुता नष्ट होओ अशी ईश्वर चरणी प्रार्थना (दुआ ) केली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र व इतर राज्यातून आलेले एकूण 22 धर्मगुरू बसलेले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सिरत कमिटीचे अध्यक्ष मुफ्ती अतीकुर रहेमान यांनी मानले. लाखोंची उपस्थिती असताना अत्यंत शिस्तीत कार्यक्रम पडल्याने सीरत कमिटीतर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.
उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना मौलाना सज्जाद नोमानी व समोर उपस्थित जनसमुदाय दिसत आहे