सपत्निक वाघूर धरणाचे जलपूजन ; दोन वर्षांची जळगाव शहराची पाण्याची चिंता मिटली.

सपत्निक वाघूर धरणाचे जलपूजन ; दोन वर्षांची जळगाव शहराची पाण्याची चिंता मिटली

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे 100 टक्के पूर्ण भरले आहे. त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आज बुधवार, दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी सपत्निक धरणस्थळी साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले आणि परमेश्वराचे आभार मानले.

यावेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे अभियंता पी. एम. पाटील, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले, सहाय्यक अभियंता विशाल सुर्वे, तापी पाटबंधारे सहाय्यक अभियंता अजय जाधव यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

याप्रसंगी वाघूर धरण असेच यापुढेही सदैव 100 टक्के भरून या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या जळगाव शहरासह जामनेर, भुसावळ तसेच अन्य परिसरातील गावांना लाभ मिळू द्यावा व सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी आर्त आळवणी वरुणदेवताचरणी लीन होऊन केली. वाघूर धरणाचे बांधकाम 1978 मध्ये झाल्यापासून आतापर्यंत ते चार वेळा 100 टक्के भरले आहे. पुढील दोन वर्षांसाठी जळगाव शहराच्या जलसाठ्यात भर पडली असून नागरिकांची जलचिंता ही मिटली आहे.

  • Related Posts

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे…

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

    नंदुरबार जिल्हयात स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्याची उच्च न्यायालयातील ॲड. मनोज सूर्यवंशी यांची मागणी…

    नंदुरबार जिल्हयात स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्याची उच्च न्यायालयातील ॲड. मनोज सूर्यवंशी यांची मागणी…

    धरणगाव – सोनवद बाभुळगाव रस्त्यालगत विट भट्ट्या मालकांनी उडवल्या नियमांची धज्जीया

    धरणगाव – सोनवद बाभुळगाव रस्त्यालगत विट भट्ट्या मालकांनी उडवल्या नियमांची धज्जीया

    रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळेतील मुलांना जुंपलं, जिल्हा परिषद शिक्षकांचा कारनामा; पालकांकडून संताप व्यक्त

    रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळेतील मुलांना जुंपलं, जिल्हा परिषद शिक्षकांचा कारनामा; पालकांकडून संताप व्यक्त