विवेकानंद प्रतिष्ठान संचालित प्राथमिक शाळा वाघ नगर येथे ‘ गोपाळकाला ‘ तसेच दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न.
दिनांक 27 ऑगस्ट मंगळवार रोजी विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सव आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना तसेच कोणतेही काम एकजुटीने केल्यास त्या कामांमध्ये यश मिळतेच हे नैतिक मूल्य पटवून सांगणे आहे. तसेच दहीहंडी यावेळेस वर्गातील मंत्रिमंडळ विद्यार्थिनी गट आणि दुसरा विद्यार्थी गट मध्ये फोडण्यात आली. त्यासोबतच प्राथमिक विभागातील तिसरी व चौथीचे विद्यार्थ्यांनी रास व लेझीम ते सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षाली सोनार ने केले, आणि इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये कृष्णाची माहिती वैष्णवी पाटील, दहीहंडीचे शास्त्रीय महत्त्व नंदिनी तेली, आणि भजन तेजस्विनी बाठे, प्रणाली बावस्कर या विद्यार्थ्यांद्वारे सादरीकरण करण्यात आले. आणि गोपाळ कृष्णाच्या जयघोष करत दोघी गटांनी दहीहंडी फोडल्या आणि आनंद उत्साहात कार्यक्रम पार पडला. तसेच जयघोष शर्वरी राजपूत आणि शाळेच्या शिक्षकांनी केला. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील व समन्वयीका वैशाली पाटील आणि जयश्री वंडोळे देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आणि नियोजन हर्षाली सोनार यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील व समन्वयिका वैशाली पाटील आणि जयश्री वंडोळे यांचे मार्गदर्शन लाभले, त्याचबरोबर सर्व शिक्षक बंधू भगिनींचे देखील सहकार्य लाभले.